प्रतिनिधी/ पणजी
गोव्याच्या प्रस्तावित कृषी धोरणाबाबत लोकांकडून माहिती घेण्यासाठी कृषी संचालनालयाने राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 17 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत या जाहीर सभा सर्व तालुक्यांतील विभागीय कृषी कार्यालयांमध्ये होणार आहेत.
तपशीलवार वेळापत्रक असे : 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता विभागीय कृषी कार्यालय, धारबांदोडा. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता विभागीय कृषी कार्यालय, मुरगाव. 19 रोजी दुपारी 2.30 वाजता विभागीय कृषी कार्यालय, वाळपई. 19 रोजी सकाळी 10 वाजता फोंडा मार्केट यार्ड, ब्लॉक ‘डी’. 19 रोजी सकाळी 10:30 वाजता मामलेदार कार्यालय कॉन्फरन्स हॉल, शासकीय कॉम्प्लेक्स बिल्डिंग, चावडी, काणकोण येथे सभा होणार आहे.
दि. 20 रोजी सकाळी 10.30 वाजता डिचोली विभागीय कृषी कार्यालय, तर 20 रोजीच दुपारी 2.30 वाजता आजोशी मंडूर पंचायत हॉल, तिसवाडी तसेच 20 रोजीच दुपारी 3 वाजता विभागीय कृषी अधिकारी कार्यालय, म्हापसा येथे सभा होणार आहे. दि. 21 रोजी नगरपालिका सभागृह सांगे येथे, 26 रोजी सकाळी 10 वाजता नगरपालिका सभागृह, केपे, 27 ऑक्टो रोजी सकाळी 10 वाजता कृषी विज्ञान केंद्र, मडगाव येथे तर पेडणे येथील कृषी कार्यालयात 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सभा होणार आहे.









