धावणारी कार होते गायब
तुम्ही आतापर्यंत अनेक भुताटकीयुक्त जागांच्या कहाणी ऐकल्या असतील. परंतु अमेरिकेतील हायवे क्रमांक 666 बद्दल ऐकले नसेल. हा जगातील सर्वात भीतीदायक महामार्ग आहे. या महामार्गावरून ये-जा करणाऱया लोकांसोबत काळीज हादरवून टाकणाऱया घटना घडल्या आहेत. या महामार्गाचा इतिहास खूप जुना असून याला ‘डेव्हिल्स रोड’ किंवा ‘द डेव्हिल्स हाय-वे’ म्हणूनही ओळखले जाते.

बदलले नाव
अमेरिकेच्या हायवे 666 चे नाव मे 2013 मध्ये बदलून 491 करण्यात आले. या हायवेला हा क्रमांक 1926 मध्ये देण्यात आला होता. हा महामार्ग निर्माण झाल्यापासूनच यावर मोठय़ा संख्येत अपघात होत राहिले आणि बाइक अन् कार इत्यादी गायब होण्याचे प्रकार घडले. द डेव्हिल्स हायवेर सातत्याने होत असलेल्या दुर्घटनांमुळे लोक या महामार्गाचा क्रमांक बदलण्याची मागणी करत होते. कारण या सर्व घटनांमध्ये हायवेचा अशुभ क्रमांक असल्याचे त्यांचे मानणे होते. याचमुळे या हायवेचा क्रमांक बदलण्यात आला आहे.
कारच बेपत्ता
1930 मध्ये या महामार्गावरून एक काळय़ा रंगाची पीएर्से-एरो रोडस्टर कार अचानक गायब झाली होती. ही कार शोधण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला, परंतु हाती काहीच लागले नाही. या महामार्गावर होणाऱया दुर्घटनांमध्ये एका सैतानी कारचा हात असल्याचे काही जणांचे सांगणे आहे. तर लोक आज देघील या महामार्गावरून जाण्यास घाबरत असतात.









