प्रत्येकाकडे आहे बंदूक
एक शहर जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक असून येथे जवळपास प्रत्येकाकडे बंदूक किवा रायफल आहे. येथे मोठ्या संख्येत गुन्हे घडतात असेही नाही, तरीही लोक घरातून बाहेर पडताना स्वत:सोबत शस्त्र बाळगतात. आर्क्टिकच्या इन्फ्लुएंसर सेसिलिया ब्लोमडाहल या बर्फाळ नार्वेजियन बेटसमूह स्वालबार्डवर राहतात आणि त्यांनी तेथील अनोख्या जीवनशैलीविषयी अनोखी माहिती दिली अहे. तेथे घरातून बाहेर पडताना लोक नेहमी स्वत:सोबत एक बंदूक बाळगतात. या शहरातील बहुतांश लोक स्वत:सोबत शस्त्र बाळगतात. या ध्रूवीय शहरात पोलर बीयर म्हणजेच ध्रूवीय अस्वल मोठ्या संख्येत आढळून येतात. येथे कधीही कुठल्याही ठिकाणी ध्रूवीय अस्वल फिरताना दिसून येऊ शकते. याचमुळे लोक घरातून बाहेर पडताना स्वत:सोबत बंदूक किंवा रायफल बाळगत असल्याचे ब्लोमडाहल यांनी सांगितले. ध्रूवीय अस्वलापासून सुरक्षेसाठी शस्त्र आवश्यक आहे, येथे माझ्या 9 वर्षांच्या वास्तव्यात कधीच स्वत:च्या रायफलचा वापर करावा लागलेला नाही. परंतु जंगलात फिरताना स्वत:कडे रायफल किंवा फ्लेयर गन बाळगावी लागते असे त्यांनी म्हटले आहे.
शहरात बंदूक घेऊन फिरण्यास मनाई
बंदुकांचा वापर केवळ जीवनासाठी धोका निर्माण करणाऱ्या स्थितींमध्येच केला जाऊ शकतो. शहराच्या आत अशाप्रकारच्या शस्त्रास्त्रांची अनुमती नसते. लॉन्गइयरब्येन शहराच्या दुकाने आणि सार्वजनिक भवनांमध्ये लोडेडे बंदूक नेणे प्रतिबंधित असल्याचे स्वालबार्डच्या गव्हर्नर कार्यालयाने स्पष्ट केले आहे. बंदूक बाळगणे देखील कायदेशीर अनिवार्य नाही, परंतु शिकाऱ्यांपासून बचावासाठी काही तयारी राखणे आवश्यक आहे. क्षेत्राच्या रहिवाशांना स्वत:च्या बंदूका थेट गव्हर्नर कायालयातून प्राप्त कराव्या लागतात तसेच बंदूक प्राप्त करण्यापूर्वी अर्ज करावा लागतो.
शहर सर्वात सुरक्षित ठिकाण
या शहराला जगातील सर्वात सुरक्षित स्थानांपैकी एक मानले जाते. या शहराची भौगोलिक रचना याला भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित करते. तर येथील लोकसंख्या इतकी कमी आहे की गुन्हेगारी घटना खूपच कमी घडतात. कारण याठिकाणाचा कुणीच स्थायी रहिवासी नाही. या सर्व कारणांमुळेच येथे ग्लोबल सीड वॉल्ट तयार करण्यात आला आहे. यात पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या प्रजातींची बीजं संरक्षित आहेत.









