मुंबई
अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोमवारी भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोमवारीही रुपयाच्या तुलनेत डॉलर्स या अमेरिकन चलनाची ताकद वाढल्याचे दिसून आले. दिवसअखेर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 31 पैशांनी घसरून 82.78 वर स्थिरावला. सकाळच्या सत्रात आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया 82.35 वर होता. त्यानंतर दिवसभरात 82.32 या उच्च आणि 82.80 पर्यंतच्या कमी पातळीवर फेरबदल झालेले दिसून आले. दिवसअखेर अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया अखेर 82.78 वर स्थिरावला. यापूर्वी गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस 82.47 या पातळीवर बंद झाल्यामुळे एकंदर त्यात आणखी 31 पैशांनी घसरण झाल्याचे स्पष्ट झाले.









