मार्ग वाहतुकीसाठी बंद, दुरूस्तीकाम सुरू
प्रतिनिधी /पणजी
येथील मांडवी नदीवरील ‘अटल सेतू’ या मुख्य पुलावरून फ्ढाsंडय़ाहून आलेली वाहने पणजी शहरात उतरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तिसऱया जोडपुलाचा रस्ता अचानक खचला असून तो आता पुन्हा करण्याची यातायात सुरू झाली आहे. यापुर्वी हा जोडपूल केवळ एक दिवस वाहनांसाठी सुरू करुन नंतर बंद करण्यात आला.
ओल्ड गोवा, फ्ढाsंडा येथून अटल सेतू मार्गाने येणाऱया वाहनांना पणजीत खाली उतरता यावे म्हणून सदर जोडपूल तयार करण्यात आला असून तो चालू करण्यापूर्वीच रस्ता खचल्याने त्याच्या कामाबाबत संशय निर्माण झाला आहे. जुना मांडवी पूल आणि अटल सेतूच्या मधोमध आंबेडकर उद्यानाच्या बाजूला हा जोडपूल तयार करण्यात आला असून अटल सेतूवरून पणजीत येण्यासाठी ती सोय केली होती.
जोडपुलाला जोडणाऱया रस्त्याचे बांधकाम चांगल्या दर्जाचे करण्यात आले नाही म्हणून तो खचल्याचे समोर येत आहे. आता हा खचलेला रस्ता पुन्हा सारखा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्या रस्त्याचे कामच निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. अटल सेतू पुलावर देखील अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्ता खचला होता. तोच प्रकार या तिसऱया जोडपुलाच्या रस्त्याबाबत होत असल्याचे चित्र आहे.