जानेवाडीतील गल्लीतील नागरिकांचे हाल : त्वरित पाईप घालण्याची मागणी
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या विविध गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थींना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. जानेवाडी गावातही रोजगार हमी योजनेअंतर्गत कामकाज सुरू करण्यात आले आहे. रोजगार हमी योजनेतून गटार काढली आणि एका गल्लीतील रस्ताच बंद झाला आहे. त्यामुळे गल्लीतील नागरिक अक्षरश: संतापले आहेत. जानेवाडी गावातील चव्हाट गल्लीच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच गटारीसाठी खड्डा काढला आहे. रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच खड्डा असल्यामुळे आम्ही जायचे कसे, असा प्रश्न या गल्लीतील नागरिकांनी उपस्थित केला आहे. महिलांना रोजगार मिळावा ही आमची ही अपेक्षा आहे. मात्र त्यांनी रस्त्यावरील गटार खणून सदर रस्ता बंद केल्यामुळे गल्लीतील नागरिकांनी जनावरे कशी घेऊन जायची, असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे.
ग्रा. पं. सदस्यांनी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावा
गल्लीतील रस्त्याच्या ठिकाणी गटारसाठीखोदाई केली आहे. त्यामुळे येणे जाणे बंद आहे.रोहयो महिलांनी जर रस्त्याच्या ठिकाणची गटार सोडून अन्य ठिकाणी गटारीचे काम केले असते तर ही समस्या निर्माण झाली नसती. तरी सदस्यांनी ही समस्या दूर करावी.
-नागेश पावशे









