तात्काळ डागडुजी करा : मनसेची सार्वजनिक बांधकामकडे मागणी
न्हावेली / वार्ताहर
निरवडे आरोस तिठा ते न्हावेली आरोस बाजार मार्ग रस्ता खड्डेमय असल्याबाबत आज मनसेचे पदाधिकारी ,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता श्री वैभव सगरे यांची भेट घेतली. ह्यावेळी न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर ,विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष संदेश सावंत, यांनी निवेदन देत लक्ष वेधले . व त्या ठिकाणी मागील काही दिवसात त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार व बरेच अपघात झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तर काही ठिकाणी खडी रस्त्यावर आल्यामुळे गाडी चालविणे त्रासदायक ठरत आहे याबाबत त्यांनी लक्ष वेधले. तर अभियंता श्री वैभव सगरे यांनी सदर कामाच्या टेंडरचे काम चालु असून येत्या पंधरा दिवसात सदर काम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे आश्वासन उप अभियंता श्री सगरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी मनविसे जिल्हा सचिव नीलेश देसाई, तालुका सचिव मनोज कांबळी ,मनविसे विभाग अध्यक्ष श्री चेतन पार्सेकर, गिरगोल दिया,राज धवणं, हेमचंद्र (बाळू) सावळ ,अमोल पार्सेकर,प्रथमेश नाईक, नवनाथ पार्सेकर आदी उपस्थित होते.तर येत्या पंधरा दिवसात काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला.









