Anarasa दसरा झाला कि दिवाळीचे वेध लागतात. लवकरच दिवाळी येत आहे. दिवाळीत घरोघरी फराळाचे नानाप्रकार केले जातात.पण अनारसे हा प्रकार किचकट पदार्थ असल्यामुळे शक्यतो हा पदार्थ विकतच आणला जातो.पण आज आपण अनारसे परफेक्ट बनवण्यासाठी काही टिप्स तर सांगणार आहोतच त्यासोबतच योग्य प्रमाणासह खुसखुशीत अनारसे कसे बनवायचे हे आज आपण जाणून घेऊयात.
साहित्य
तांदूळ
गूळ
तूप
तेल
केळ
खसखस
कृती
अनारसे बनवण्यासाठी ३ वाटी जुना तांदुळ वापरा.यासाठी कोणताही तांदुळ चालू शकेल. तांदुळ कमीतकमी 3 दिवस भिजू द्या.तीन दिवस तांदूळ दररोज स्वच्छ धुवून त्यातील पाणी बदलावे.चौथ्या दिवशी तांदुळ चाळणीत घालून निथळून घ्यावे आणि घरातच एका सुती कापडावर अर्धवट वाळवून घ्यावेत.(तांदुळ थोडे दमट असावेत कारण त्यांत वरून पाणी चालत नाही.)अर्धा पाऊण तास झाल्यानंतर तांदळाची अगदी बारीक पिठी करून घ्यावी आणि चाळून घ्यावी.
जितक्या वाट्या पीठ असेल तितक्या वाट्या त्यामध्ये किसलेला गुळ घालावा.आणि त्यामध्ये १ चमचा तूप घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यावे.मळलेल्या पिठाचे मोठे मोठे गोळे करून घट्ट झाकणाच्या डब्यात २ दिवस ठेवावेत . २ दिवसांनी पुन्हा एकदा डब्यातील पीठ बघुन मळून घ्या .जर पीठ कोरडं वाटत असेल तर त्यात केळं घालुन पीठ मळून पुन्हा एक दिवस ठेवा.तीन दिवसानंतर पिठाचे छोटे गोळे करून घ्यावेत.आणि पाटावर खसखस घेऊन अनारसे थापावेत.यानंतर गॅस वर तेल किंवा तूप गरम करत ठेवावे.आणि मंद आचेवर अनारसे एका साईडने ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यावेत. (अनारसे तळत असताना अनारस्याच्या वरच्या बाजूला पळीने तेल घालावे. यामुळे वरची बाजू कच्ची राहत नाही.)
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









