Supreme Court : ‘भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून भारतातील प्रत्येकाला स्वतःचा देव निवडण्याचा अधिकार आहे. असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने एका आध्यात्मिक गुरूला ‘परमात्मा’ म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. तसेच याचिकाकर्त्याला १ लाख रू दंड केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात एका जनहीत याचिका दाखल केली गेली होती. यामध्ये आध्यात्मिक गुरू श्री श्री अनुकुल चंद्र यांना एक परमात्मा म्हणून घोषीत करावे अशई मागणी केली होती. ही याचिका उपेंद्रनाथ दलाई यांनी दाखल केली असून याचिकाकर्त्याने त्याचे गुरू अनुकुल चंद्र हे भविष्य काळाच्या कृपेने या धरतीवर अवतरले आहेत असे याचिकेत नमुद केले आहे.
या याचिकेला प्रतिसाद देताना सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करता येणार नाही असे म्हणून “भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून भारतातील नागरिकांनी श्री श्री ठाकूर अनुकुल चंद्र यांना परमात्मा म्हणून स्वीकारावे असे निर्देश दिले जाऊ शकत नाही.” असे न्यायमूर्ती एमआर शहा आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हणून याचिका फेटाळली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते उपेंद्र नाथ दलाई यांना १ लाख रूपयांचा दंड ठोठावून “आता लोक अशा जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी किमान चार वेळा विचार करतील.” अशी टिप्पणी केली आहे. न्यायालयाने दलाई यांना चार आठवड्यांत दंड जमा करण्यास सांगितले.
Previous Articleमाजी महापौर एकवटले; राजभवनाबाहेर कोश्यारींच्या निषेधार्थ धरणे
Next Article पुण्यात गांजा विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक









