लाखो मतेही मिळविली, लोकप्रतिनिधी होता होता राहिला
ब्राझील या देशाच्या इतिहासात एक अशी घटना घडली होती, जी आजही लोकांना चकित करते. 1958मध्ये ब्राझीलमधील सर्वात मोठे शहर साओ पावलोच्या सिटी कौन्सिलसाठी निवडणूक झाली होती, या निवडणुकीत एक असा उमेदवार होता, ज्याची कुणी अपेक्षाच केली नव्हती. तेथे एका गेंड्याने निवडणूक लढवत लाखो मतेही मिळवित उर्वरित उमेदवारांना मागे टाकले होते.
निवडणूक लढविणारा हा गेंडा प्रत्यक्षात ‘काकेरेको’ नावाचा मादी गेंडा होता. जो साओ पावलो प्राणिसंग्रहालयात राहत होता. त्याला कुठल्याही राजकीय पक्षाने नव्हे तर विद्यार्थी आणि बुद्धिवंतांच्या एका समुहाने विरोधाचे प्रतीक म्हणून निवडणुकीत उतरविले होते. त्यावेळी ब्राझीलमध्ये भ्रष्टाचार आणि अक्षमतेचा बोलबाला होता आणि लोक प्रस्थापित राजकारण्यांना वैतागले होते. हीच निराशा व्यक्त करण्यासाठी त्यांनी एक असा उमेदवार निवडला जो बोलू शकत नव्हता.
रितसर प्रचार देखील
काकेरेकोला केवळ उमेदवार करण्यात आले नव्हते तर त्याच्यासाठी अनोखी मोहीमही राबविण्यात आली. त्याच्या समर्थकांनी उपहासात्मक पोस्टर आणि प्रचारसामग्रीचा वापर केला. ज्यात मानवी राजकीय नेत्यांवर भरवसा करता येत नसल्यास एक गेंडा चांगला पर्याय ठरू शकतो असे यात म्हटले गेले होते.
मिळाली सर्वाधिक मते
लोकांनी या उपहासात्मक प्रचाराला गांभीर्याने घेतले आणि निवडणुकीचा निकाल चकित करणारा आला. काकेरेकाला जवळपास 1 लाख मते मिळाली. हा आकडा अन्य कुठल्याही उमेदवारापेक्षा अधिक होता. साओ पावलोमध्ये सिटी कौन्सिलच्या जागांसाठी हा एक असाधारण आकडा होता. म्हणजेच तांत्रिक स्वरुपात तोच निवडणुकीत विजेता होता.
कायद्याची आली अडचण
कायदेशीर स्वरुपात एका गेंड्याला पद देता येत नव्हते. याचमुळे त्याच्या मतांना अखेर अमान्य घोषित करण्यात आले. औपचारिक स्वरुपात त्याला निवडणुकीत विजयीही घोषित करता आले नाही. तरीही काकेरेकोचा हा विजय एक शक्तिशाली संदेश होता, ज्यातून लोक त्या काळातील राजकीय नेत्यांना किती वैतागले होते हे कळत होते.
राजकीय उदाहरण
ही घटना केवळ एक थट्टा नव्हती, तर ब्राझिलियन मतदारांची घोर निराशा आणि त्यांच्या विरोधाचे एक सशक्त माध्यम ठरली. काकेरेकोला निवडणूक लढविण्यास लावल्याने लोक पारंपरिक राजकारणाला किती उबगले होते हे व्यक्त झाले. ही घटना जगभरात राजकीय व्यंग आणि विरोधाचे एक अनोखे उदाहरण म्हणून नोंद झाली.
काकेरेको 1962 मध्ये स्वत:च्या मृत्यूपर्यंत साओ पावलो प्राणिसंग्रहालयात राहिली. परंतु तिचे नाव ब्राझीलच्या राजकीय इतिहासात कायमस्वरुपी नोंदले गेले. ती अशा गेंड्याच्या स्वरुपात ओळखली जाते, जिने एका पूर्ण देशाला कधीकधी सर्वात अनपेक्षित उमेदवारही सर्वात शक्तिशाली संदेश देऊ शकतो हे दाखवुन दिले.









