वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून शौकिन अधीर झालेल्या हॉकी इंडिया लीगचे तब्बल 8 वर्षांनंतर पुनरागमन होत आहे. 2024-25 साली हॉकी इंडिया लीगसाठी आता हॉकी इंडियाने नोंदणीला प्रारंभ केला आहे.
2024-25 च्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत पुरुषांच्या विभागात 8 तर महिलांच्या विभागात 6 संघांचा समावेश राहिल. हॉकी इंडिया लीगसाठी आता देशातील हॉकीपटूंना 30 जूनपूर्वी आपल्या नावांची नोंद करणे आवश्यक राहिल. महिला हॉकी क्षेत्राला अधिक प्राधान्य मिळावे यासाठी हॉकी इंडियाने पहिल्यांदाच हॉकी इंडिया लीग स्पर्धा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. हॉकी इंडियाने या स्पर्धेसाठी जागतिक हॉकी क्षेत्रातील अव्वल 15 देशांच्या हॉकीपटूंनाही निमंत्रित केले आहे.









