ओटवणे प्रतिनिधी
माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९७.५६ टक्के लागला. या परीक्षेला बसलेल्या ४१ पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या शाळेतून प्रथम क्रमांक मधुरा मिलिंद सावंत ९४.८० %, द्वितीय क्रमांक सोमदत्त प्रमोद भोगण,९२ %, तृतीय क्रमांक लोकेश रामदास भोगण ९०.६० % या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर विशेष श्रेणीत ३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ८ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, सचिव सिए लक्ष्मण नाईक, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिक भाऊसाहेब चौरे, इतर शिक्षक व कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.
Previous Articleकलंबिस्त इंग्लिश स्कुलचा निकाल १०० टक्के
Next Article मदर क्विन्स् इंग्लिश स्कुलमधून सोहम सावंत प्रथम









