शाहुवाडी प्रतिनिधी
कर्नाटक मधील गोकाक येथील कष्टकरी बांधव निघाले होते विशाळगडला. अडकले शाहूवाडी पोलीस स्टेशनला पण तिथेच माणुसकी अवतरली आणि त्यांना आधार मिळाला. चार दिवसापूर्वी कोल्हापूर शहरात घडलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई .असे साधर्म्य या वाहनातही आहे की काय अशी शंका निर्माण झाली आणि मग त्यातूनच समाज माध्यमावर मेसेज व्हायरल झाल्याने सदर घटना घडली.मात्र सतर्कता आणि सखोल चौकशी यामुळे अनर्थ ठरला.
शाहूवाडी पोलीस ठाण्याचे आवारात सोमवारी रात्री घडलेली घटना.वेळीच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी विशेष लक्ष दिल्याने पुढील अनर्थ टळला.समाज माध्यमाच्या माध्यमातून कोणतीही अपरिचित घटना घडेल अशी अफवा अथवा कृत्य कोणीही पसरवू नये अथवा कायदा हातात घेऊ नये. असे आवाहन हे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केले.
पोलीस स्टेशन आवारात जमलेली गर्दी आणि गाडीतून आलेले हे पर्यटक यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. मात्र शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक प्रियांका सराटे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत सदर प्रकरण अतिशय सीताफिने हाताळले.आणि समाज माध्यमातून पसरलेला गैरसमज दूर केला. सखोल माहिती नुसार सदर गाडीतून आलेले हे पर्यटक कर्नाटक गोकाक मधील असून विशाळगडला देवदर्शन साठी निघाले होते अशी माहिती खात्रीलायकरित्या समोर आली. मात्र समाज माध्यमातून व्हायरल झालेल्या एका मेसेजमुळे सर्वांची धावपळ उडाली.
आणि त्यांना आधार वाटला
तपासाअंती सर्व बाबी स्पष्ट झाल्या. मात्र रात्र वाढत चाललेली पोटात भुकेचे काहूर माजलेले जवळ अन्न नाही.आणि त्यातच आपण सर्वजण पोलीस स्टेशनला अडकलेलो. त्यासोबतच भाषेची अडचण यामुळे त्या पर्यटकांचे स्थिती केविलवाणी झाली होती.मात्र अशावेळी देखील पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी आपल्या कर्तव्या बरोबरच जबाबदारीची जाणीव ठेवत या पर्यटकांना आधार दिला त्यांच्यासोबत मलकापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रवीण प्रभावळकर, माजी नगरसेवक विकास देशमाने यांनी त्या पर्यटकांच्या चहा बिस्किटाची सोय केली. यावेळी युवराज काटकर,सुरेश पटेल आदींउपस्थित होते.अशा भीषण परिस्थितीत अनोळखी माणसानी देखील दाखवलेला आपलेपणा पाहून त्या पर्यटकांच्या चेहऱ्यावरील समाधान बरेच काही सांगून जात होते .
Previous Articleसिंदखेडराजाजवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू
Next Article आघाडीत सगळेच पक्ष महत्त्वाचे









