कोल्हापूर :
कोल्हापुरात एसटीच्या ताफ्यात 437 बस आहेत. यामध्ये केवळ 6 ‘ई’ बस आहेत. या ‘ई’ बस एसटी महामंडळाने खासगी कंपनीमार्फत घेतल्या आहेत. त्या कंपनीचेच चालक आहेत. जरी कंपनीचे चालक असले तरे एसटी महामंडळ त्या चालकांची पात्रता तपासणी करते. ई बस चालविण्याचा तीन वर्षाचा अनुभव असणारे चालकच नियुक्त केले जात असल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतुक अधिकारी संतोष बोगारे यांनी दिली आहे.
मुंबई येथील कुर्ला पश्चिममध्ये चालकाच्या चुकीमुळे बेस्टच्या बसला अपघात झाला. यामध्ये 42 जण जखमी 7 जणांचा मृत्यू झाला. मोठी ईलेट्रीक बस चालविण्याचा केवळ तीन दिवसाचे प्रशिक्षण घेणाऱ्या चालकाच्या हाती ई बस देण्यात आल्यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर सार्वजाणिक वाहतूक सेवेतील खासगी कंपनीचे चालक चर्चेचा विषय बनले आहेत.
अवजड प्रवाशी वाहनावरील चालकांवर बसमधील 50 ते 60 लोकांचा जीव आवलंबून असतो. त्यामुळे संबंधित यंत्रणनेस चालकाची निवड पारखूनच करावी लागते. मुंबईतील आपघातच्या पार्श्वभूमीवर एसटीमधील चालक नियुक्तीबाबत माहिती घेतली असता एसटीचे विभागीय वाहतूक निरिक्षक संतोष बोगारे म्हणाले, एसटीमध्ये चालक नियुक्ती सर्व नियमावलीनुसारच केली जाते. चालकाकडे प्रवासी अवजड वाहन चालवण्याचा तीन वर्षापूर्वीचा परवाना असणे बंधनकारक आहे. खासगी कंपनीच्या चालकांची ही सर्व पडतळणी एसटी विभाग करते. तसेच एखादा चालकाकडून गैरवर्तन होत असेल अथवा त्याच्या विरोधात प्रवाशांकडून तक्रारी येत असल्यास संबंधित चालकास हटविण्याच्या सूचना संबंधित कंपनीला केल्या जातात. कंपनीही त्याची कार्यवाही त्वरीत करते. सध्या एसटी बसकडे केवळ 6 ई बस असून त्याही खासगी कंपनीमार्फत घेण्यात आल्या आहेत. त्यांच्यावरील चालक नियुक्तही एसटी बसच्या चालक भरतीच्या नियमावलीनुसार केली आहे. तीन वर्षापूर्वीचा अवजड प्रवासी वाहन परवाना (एचपीव्ही) असणाऱ्यांनाच घेतले असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.








