निपाणी : निपाणी दर्गा गल्ली येथील गुंड अश्रफअली याचा बुधवार 2 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास भीमनगर हद्दीत तीक्ष्ण हत्यारांनी खून झाला होता. या प्रकरणातील उर्वरित आरोपी अतिश अशोक बेलेकर (वय 27, रा पावले गल्ली, निपाणी), ओंकार विनोद काटकर (वय 26, रा आंदोलननगर, निपाणी), अमित अविनाश माने (वय 24, रा रेणुका मंदिर जवळ, सिद्धार्थनगर, निपाणी), शंतनु अशोक चौगले (21, रा. बुद्धनगर, निपाणी), अजित उर्फ अजिंक्य आप्पासाहेब नाईक (वय 27, रा अकोळ रोड निपाणी) अशी उर्वरित अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी या खुनासंदर्भात रवी शिरगावे, ऋतिक पावले, ओम कंदले, अरबाज सय्यद, रोहित पठाडे, अनिकेत घोडगेरी, पारस श्रीखंडे या सात जणांना यापूर्वीच अटक झाली आहे. पूर्वीच्या वादातूनच हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे
यापूर्वी अश्रफअली व त्याचा भाऊ सैफअली यांच्याशी दोन-तीनवेळा मोठा वाद झाला होता. त्या रागानेच वरील सर्व आरोपींनी टोळक्याने अश्रफअली याचा बुधवारी रात्री भीमनगर हद्दीत खून केला होता. मंगळवारी अटक केलेले आरोपी आतिश बेलेकर, ओंकार काटकर, अमित माने, शंतनू चौगुले, अजित उर्फ अजिंक्य नाईक या सर्वांना निपाणी न्यायालयात हजर करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. याप्रकरणी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसर्गी, डीएसपी गोपाळकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय बी. एस. तळवार, निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी गौडा, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास पूर्ण केला.









