कधी तुम्ही लाल रंगाचा समुद्र किनारा पाहिला आहे का? लाल रंगाचा समुद्र किनारा असलेले ठिकाण एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटते, येथील वाळू लाल रंगाची असून पाणी चमकणारे आहे. या ठिकाणाला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. इंग्लंडच्या साउथ डेवॉनच्या टोरबे किनाऱ्यावर वसलेले ब्रॉडसँड्स बीच स्वत:चे अनोखे सौंदर्य आणि शांत वातावरणामुळे आजही ‘युकेचे बेस्ट सीक्रेट’ संबोधिले जाते.
ब्रॉडसँड्स बीच स्वत:च्या लांब आणि लाल वाळूसाठी ओळखले जाते. हे बीच दोन खडक हेडलँड्सदरम्यान फैलावलेले असून याला ‘इंग्लिश रिवियरा’ देखील म्हटले जाते. हा किनारा ‘ब्ल्यू फ्लॅग’चा दर्जा प्राप्त करून तो समुद्र किनाऱ्याची सफाई, सुरक्षा आणि वैशिष्ट्यासाठी दिला जातो. याचबरोबर या समुद्र किनाऱ्यावर भरपूर मोकळी जागा आणि शांतता अनुभवायला मिळते. परंतु उन्हाळ्यात येथे काही प्रमाणात गर्दी असू शकते. ब्रॉडसँड्स बीच येथील लांब प्रोमेनेडसाठी ओळखले जाते, ज्याच्या किनाऱ्यावर रंगबिरंगी हट्स दिसून येतात. हे हट्स दिवसभरासाठी भाडेतत्वावर मिळविता येतात. याचबरोबर हे ठिकाण कोस्टल वॉकसाठी उत्तम आहे. उंच खडकांमधून खाली उतरल्यावर जेव्हा लाल समुद्र किनाऱ्यावर पोहोचता, तेव्हा थकवा विसरायला होतो. याचबरोबर सुंदर पक्षी, डॉल्फिन, सील आणि अनेक प्रकारचे मासे पहायला मिळतील. परंतु या ठिकाणापर्यंत पोहोचणे सोपे नाही, समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना उंच-सखल खडकांमधून जावे लागते. काही हिस्स्यांमध्ये हँडरेल्स लावण्यात आले आहेत. येथे एक मोठा कार पार्किंग एरिया असून तो थेट प्रोमेनेडपर्यंत नेतो. ब्रॉडसँड्स बीच लंडनपासून सुमारे 220 मैल अंतरावर आहे.









