9 फूट उंचीची ख्रिसमस ट्री आकारातील हेअरस्टाइल
प्रख्यात हेअरस्टाइलिस्ट दानी हिसवानीचे नाव आता सर्वात उंच हेअरस्टाइल तयार केल्याने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे. हिसवानीने दुबईत ख्रिसमस ट्रीच्या आकारातील 9 फूट 6.5 इंच उंचीची हेअरस्टाइल तयार केली आहे. या हेअरस्टाइलचा व्हिडिओ अलिकडेच वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
या अनोखय हेअरस्टाइलमुळे सोशल मीडियावर लोक दानीला ट्रोलही करत आहेत. व्हिडिओत महिलेने एक हेल्मेट घातल्याचे आणि हेल्मेटमध्ये तीन धातूचे रॉड दिसून येतात. ख्रिसमस ट्रीसारखी हेअरस्टाइल करण्यासाठी दानी हिसवानीने विग, हेअर एक्सटेंशनचा वापर केला आहे. तर हेअरस्टाइल करताना बॉल्सचा वापर केला आहे.

दानी हिसवानी मागील 7 वर्षांपासून फॅशनच्या जगतात कार्यरत आहे. स्वतः दानी हेअरस्टाइलकडे पेशा न मानता कला म्हणून पाहते. दानीने यापूर्वी एका महिलेच्या डोयावर हेअरस्टाइलिंग करत एक छोटा ख्रिसमस ट्री तयार केला होता, यावेळी तिने सर्वात उंच हेअरस्टाइल तयार करण्याचे आव्हान स्वीकारले होते.
तिच्या या व्हिडिओला 3 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. परंतु अनेक युजर्स या विक्रम अणि हेअरस्टाइलला पाहून आनंदी झाले नसल्याचे चित्र आहे. ही हेअरस्टाइल नसून हेडड्रेस असल्याचे एका युजरने नमूद केले आहे. हेअरस्टाइलमध्ये महिलेने स्वतःच्या केसांचा वापर करणे गरजेचे होते, असे एका युजरने म्हटले आहे.
दानी हिसवानी ही सेलिब्रिटी हेअरस्टाइलिस्ट असून ती दुबईत वास्तव्यास आहे. मागील 15 वर्षांपासून ती सर्वप्रकारचे हेअरकट, कलरिंग आणि हेअर एक्सटेंशनशी निगडित काम करत आहे.









