रत्नागिरी :
सत्ता येते जाते. पदंसुद्धा वरखाली होत असतात. पण कुठल्याही पदापेक्षा महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींनी मला दिलेली ‘महाराष्ट्राचा लाडका भाऊ’ ही ओळख माझ्यासाठी खूप मोठी आहे, असे भावनिक उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील आभार यात्रेत काढले. तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे आश्वासन दिले.








