The readiness of the youth of Ottawa by donating blood of a rare group
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रजनी वासुदेव पावसकर या महिलेला ए बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची गरज असल्याचे समजताच सिंधूरत्न रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य आणि नियमित रक्तदाते अमेय रमेश गावडे (ओटवणे) यांनी या महिलेसाठी तात्काळ ओरोस जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत जात रक्तदान केले.
या दुर्मिळ रक्तगटाबाबत या महिलेच्या नातेवाईकांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका कार्यकारणी सचिव बाबली गवंडे, सदस्य बादल चौधरी, जिल्हा कार्यकारणी सदस्य विजयकुमार जोशी यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यानी या दुर्मिळ रक्तगटाचे दाते अमेय गावडे यांच्याशी संपर्क साधला. अमेय गावडे यांचे हे ७ वे रक्तदान असून यापूर्वीही त्यांनी तात्काळ रक्तदान करीत अनेकांचे जीव वाचविले आहेत. या अमूल्य रक्तदानाबद्दल या महिलेच्या नातेवाईकांनी अमेय गावडे यांच्यासह सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.
ओटवणे / प्रतिनिधी









