उल्कापिंड आकाशातून कोसळणे मोठी गोष्ट नाही. अनेकदा आकाशात आपण आगीचे विशाल गोळे पाहतो, ज्याच्या विस्फोटातून छोटे छोटे तुकडे पृथ्वीवर कोसळत असतात. त्यांनाच उल्कापिंड म्हटले जाते. अनेकदा हे उल्कापिंड इतक्या दूरवरून येतात की पृथ्वीवर पोहोचेपर्यंत दशकांचा कालावधी लागतो. परंतु एका कंपनीने या उल्कापिंडांचा वापर करत एक दुर्लभ घड्याळ तयार केले आहे. याची किंमत जाणून घेतल्यावर चकित व्हाल.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार स्वीत्झर्लंडमधील कंपनी लेस एटेलियर्स लुइस मोइनेटने याची निर्मिती केली आहे. ही कंपनी खास घड्याळांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. यावेळी कंपनीने तयार केलेल्या घड्याळाची जगभरात चर्चा होत आहे. यात एक किंवा दोन नव्हे तर उल्कापिंडाच्या 12 तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे. याचमुळे या अनोख्या घड्याळाचा गिनिज बुकमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कंपनीने या घड्याळाला ‘कॉस्मोपोलिस’ नाव दिले आहे. उल्कापिंडाचे जे तुकडे यात वापरण्यात आले आहेत, ते बहुतांशकरून चंद्र, मंगळ ग्रह, उल्कापात आणि लघूग्रहातून प्राप्त झाले आहेत. या घड्याळाचे डिझाइन करताना विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या घड्याळाचा व्यास 40 मिलिमीटर इतका आहे. अत्यंत सावधपणे उल्कापिंडांना कापून त्यांचा वापर करण्यात आला आहे. तज्ञ डॅनियल हास यांनी हे घड्याळ तयार केले असून याची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.









