पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील पावसाचा जोर आता ओसरणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा राज्यातील प्रभाव कमी होणार असल्याने पावसात घट होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र सध्या मध्य प्रदेश व लगतच्या भागावर आहे. याच्या प्रभावामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, याबरोबरच देशाच्या पूर्वोत्तर भागात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा आहे. महाराष्ट्रात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी असल्याने कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रावर असलेला पावसाचा जोर आता ओसरणार आहे. शनिवारी राज्याला कोणताही अलर्ट देण्यात आला नाही, तर रविवारनंतर विदर्भातील बहुतांश जिल्हय़ांना यलो अलर्ट आहे.








