आठ पैकी दोन चित्त्यांना मोठय़ा आवारात सोडले ः गेल्या 50 दिवसांपासून क्वारंटाईनमध्ये वास्तव्य
कुनो / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. यापैकी दोन चित्त्यांना रविवारी एका मोठय़ा आवारात सोडण्यात आले. हे सर्व चित्ते 50 दिवसांपासून क्वारंटाईन परिसरात राहत होते. अन्य 6 चित्ते अजूनही ठराविक क्षेत्रातच असून त्यांचे संचारक्षेत्र हळूहळू वाढवण्यात येणार असल्याची माहिती अभयारण्य निरीक्षकांकडून देण्यात आली.
शनिवारी गेट क्रमांक 4 मधून दोन चित्त्यांचे संचारक्षेत्र वाढवण्यात आले. टास्क फोर्सच्या सदस्यांनी चर्चेअंती चित्त्यांना जास्त वेळ छोटय़ाशा बंदिस्तात ठेवणे योग्य नाही, असे ठरवून त्यांना सोडण्यात आले आहे. वाढवण्यात आलेल्या क्षेत्रात हरिण, चितळ यांसारखे छोटे प्राणी त्यांच्या शिकारीसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. आता उर्वरित चित्तेही टप्प्याटप्प्याने लवकरच या क्षेत्रात सोडण्यात येणार आहेत. दोन चित्त्यांना एन्क्लोजरमध्ये सोडण्यापूर्वी, चित्ता टास्क फोर्स समितीचे सदस्य, एनटीसीएचे आयजी अमित मलिक, पीसीसीएफ वन्यजीव जे. एस. चौहान, वन फोर्सचे प्रमुख आर. के. गुप्ता आणि चित्ता प्रकल्पाशी संबंधित वैज्ञानिक आणि वन्यजीव संस्थेचे डीन उपस्थित होते. मोठय़ा आवारात सोडलेले चित्ते येत्या काही दिवसात स्वतःची शिकार स्वतःच करतील. या चित्त्यांना भारतात आणण्यापूर्वी एक महिना नामिबियामध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. कुनोमध्येही 50 दिवसांचे क्वारंटाईन राहिले. अशाप्रकारे आता 80 दिवसांनंतर त्यांना एका मोठय़ा बंदोबस्तात शिकार करण्याची संधी मिळणार आहे. या आवारात चितळ, सांबर, हरिण आदी प्राणी चित्त्यांच्या









