डीएचईचे डॉ. महादेव गावस यांची माहिती : विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन
पणजी : चालू 2023-24 या शैक्षणिक वर्षातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी आज बुधवारी सकाळी 11 वाजता जाहीर होणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचलनालयाचे (डीएचई) डॉ. महादेव गावस यांनी दिली आहे. बी. ए. बी कॉम, संगीत, रंगमंच, गृहविज्ञान, बी. एस्सी, कृषी, व्होकेशनल, बीसीए, बीबीए, पिजीडीटी, पिजीडिए या सर्व शाखांची गुणवत्ता यादी संबंधित महाविद्यालयांच्या वेब पोर्टलवर आज 14 जून रोजी सकाळी 11 वाजता घोषित केली जाईल. बीए. बी.एड, बीएस्सी., कृषी आणि बीएस्सी बी.एडसाठी गुणवत्ता यादी डीएचई गोवा संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल.
उद्या व परवा समुपदेशन
गुणवत्ता यादीत निवडलेल्या बी ए. एलएलबी, बीए. बी. एड., उमेदवारांसाठी ऑफलाईन समुपदेशन अनुक्रमे 15 जून आणि 16 जून रोजी होणार आहे. डीएचई गोवा संकेतस्थळावर तपशीलवार वेळापत्रक नमूद केले आहे, असे गावस यांनी सांगितले.
अशा आहेत विद्यार्थ्यांना सूचना
- उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर गुणवत्ता यादी तपासावी. 2. समुपदेशन आणि प्रवेश 15 जूनपासून सुरू होणार आहे. महाविद्यालयांमध्ये समुपदेशन करताना विद्यार्थ्यांनी सर्व मूळ आणि वैध कागदपत्रे सोबत न्यावीत. 3.विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जागा निश्चित करण्यासाठी प्रवेश शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करावा, असे कळविण्यात आले आहे.









