नवी दिल्ली
कोरोनापासूनच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यात महिलांचे प्रमाणे 50 टक्क्यापर्यंत वाढले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. डिसेंबर 2022 पर्यंत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांची संख्या 74 लाखाहून अधिक झाली आहे. डिसेंबर 2019 मध्ये हीच संख्या 46 लाखपेक्षा अधिक होती. देशातील आघाडीवरच्या 30 शहरांमधील महिला गुंतवणुकदारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. डिसेंबर 2019 ला 27 लाखापेक्षा अधिक असणाऱ्या महिला सध्याला 41 लाखावर पोहोचल्या आहेत.
30 शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्ये महिला गुंतवणूकदारांची संख्या 2019 मध्ये 19 लाखाहून अधिक होती. जी डिसेंबर 2022 मध्ये 32 लाखपेक्षा अधिक झाली आहे. 2020 ते 2021 या कालावधीमध्ये 11 लाख महिला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.








