अनाधिकृत वास्तव्य करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी / सोलापूर
कारागृहातून परवानगी घेऊन बाहेर आलेला कैदी सुट्टीची मुदत संपल्यानंतरही हजर न झाल्याने त्याच्याविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयराज भिमण्णा वरजन (रा. मोदीखाना, जयशंकर तालीमजवळ) विरोधात समाधान जाधवर (नेमणूक येरवडा कारागृह) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी जयराज हा परवानगी घेऊन सुट्टीवर बाहेर आला. रजेचा कालावधी संपून 19 मे पर्यंत तो कारागृहात हजर होणे बंधनकारक होते.
त्यानंतर अंतिम वाढीव मुदत संपल्याने 3 जून पर्यंत आरोपी कारागृहात हजर झाला नाही. दरम्यान याबाबत 2 जून रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात पत्राव्दारे जयराज वरजन हा सुट्टीवर गेला तो परतला नसल्याचे माहिती देण्यात आली. आरोपी जयराज यास नोटीस देऊन मुदतवाढही दरम्यानच्या काळात देण्यात आली होती. तरीही तो हजर झाला नसल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डोंगरे करीत आहेत.









