प्रतिनिधी /पणजी
केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या गोव्यातील लाभार्थींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवार दि. 31 मे रोजी दोन्ही जिह्याच्या ठिकाणी म्हणजे पणजी, मडगाव येथे संवाद साधणार आहेत. पणजीत इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहामध्ये तर मडगाव येथे रवींद्र भवन कॉन्फ्ढरन्स सभागृहामध्ये त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 अशी त्यांची वेळ आहे.
पणजी येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत असून केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, म†िच्छमारमंत्री नीळकंठ हळर्णकर आदी उपस्थित राहणार आहेत.
मडगावच्या कार्यक्रमात वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे प्रमुख पाहुणे असतील तर कृषीमंत्री रवी नाईक, बांधकाममंत्री नीलेश काब्राल, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फ्ढळदेसाई व खासदार विनय तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत.








