वृत्तसंस्था/ बेंगळूर
वरीष्ठांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत विद्यमान विजेती अनमोल खर्बसह अन्य पाच सिडेड महिला बॅडमिंटनपटूंचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
महिला एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 12 व्या मानांकित श्रीयांशी वालिशेट्टीने विद्यमान विजेती अनमोल खर्बचा 21-12, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अन्य एका सामन्यात 15 व्या मानांकित श्रेया लेलेने आपली विजयी घौडदौड कायम राखताना माजी विजेती आणि द्वितीय मानांकित अनुपमा उपाध्यायचा 13-21, 21-18, 21-14 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात देविका सिहागने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना तन्वी शर्माचे आव्हान 21-19, 21-18 असे संपुष्टात आणले. बिगर मानांकित रुजुला रामूने मानसी सिंगवर 21-19, 20-22, 21-13, चौदाव्या मानांकित साक्षी फोगटने सहाव्या मानांकित आदिता रावचा 21-18, 21-19, 21-18 असा पराभव केला. सातव्या मानांकित इशारानी बारुआने रक्षिता श्रीवर 23-21, 21-19 अशी मात केली.
पुरुष विभागात माजी विश्व कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आयुष शेट्टीचे आव्हान संपुष्टात आले आहे. चौदाव्या मानांकित आलाप मिश्राने शेट्टीचा 21-15, 11-21, 21-5 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत आयुष अगरवाल आणि श्रुती मिश्रा यांनी सात्विक रे•ाr व वैष्णवी खडकेकर यांचा 21-18, 21-14 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.









