नवी दिल्ली : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या रशिया व्याप्त प्रदेशात मार्शल लॉ लागू केला आहे. खेरसनमधील चार प्रदेशावर हा कायदा लागू केला आहे. गेल्याच महिन्यात रशियाने या प्रदेशावर स्वतःचा दावा केला होता. याचबरोबर युक्रेनमध्ये रशियाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी विशेष समन्वय परिषद स्थापन करण्याचे निर्देश राष्ट्रपती पुतिन यांनी सरकारला दिले आहेत.
आपल्या निवेदनात बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले, “रशियासाठी, रशियातील लोकांच्या भविष्यासाठी एक विश्वासार्ह भविष्य घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही कामे हाती घेतली आहेत”. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून रशियाला युक्रेनमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पण रशियन राष्ट्राध्यक्षांच्या या हालचालीमुळे यक्रेनच्या अडचणीत वाढ झाली आहे. या राजकिय घडामोडीविषयी बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यामुळे अर्थव्यवस्था, उद्योग आणि उत्पादनाची स्थिरता वाढण्याचा विश्वास व्यक्त केलाय.
Previous Articleवेंगुर्ले हॉस्पिटल नाका येथे दीपावली शो टाईमचे आयोजन
Next Article दहिटणे येथे घरफोडी; दागिन्यांसह रोकड लंपास









