तासगाव प्रतिनिधी
तासगांवातील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या 245 व्या रथोत्सवात अनेक गणेशभक्तांनी सहभाग दाखवून रथोत्सवाची शोभा वाढवली. त्यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळीसह विविध क्षेत्रातील, अधिकारी, व्यापारी, गणेशभक्त यांचा समावेश होता. तर या प्रसिध्द रथोत्सवामुळे सर्वच गणेभक्तात उत्साहाचे वातावरण पाहवयास मिळाले. यावेळी ताई खोबरे..ताई पेढे.. या जल्लोषाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
तासगांवातील श्री गणपती मंदिरात सकाळ पासूनच श्रीं च्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी दर्शनासाठी विश्वस्त राजेंद्र पटवर्धन व आदितीताई पटवर्धन यांनी व प्रशासनाने नेटके असे नियोजन केले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय धोत्रे, जि. म. बँकेचे मा. संचालक डॉ. प्रतापनाना पाटील, मा. नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, तासगांव अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश्वर हिंगमिरे, उपाध्यक्ष कुमार शेटे, संचालक राजेंद्र माळी, विनय शेटे, तासगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार विश्वासतात्या पाटील, मा. उपनगराध्यक्ष संतोष बेले, प्रा. जी. के. पाटील, जलदेवता विकास सोसायटी, बेंद्रीचे संचालक अनिल पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप माने, शहर अध्यक्ष विशाल शिंदे, सतिश ट्रेडिंग कंपनीचे सतिश माळी, सिध्दीविनायक कोल्ड स्टोअरेजचे सुदाम माळी, गणेश माने, श्रीराम कोल्ड स्टोअरेज अॅन्ड अॅग्रोटेकचे रामचंद्र माळी, निखिल माळी, बेदाणा असो. चे संचालक विनायक हिंगमिरे, श्री धारेश्वर ट्रेडिंग कंपनीचे भूपाल पाटील, श्री गॅरेजचे राम बाबर, पारस ट्रेडर्सचे विकास शहा, उद्योजक सतिश लिंबळे, संतोष पेटकर, जयश्री ट्रेडर्सचे विठठल तात्या पाटील, इंद्रजित चव्हाण, धनराज जाधव, संतोष माळी, वाल्मिक खैरनार, शिवनेरी मंडळाचे संदीप सावंत, शितल पाटील, अभियंता भालचंद्र सावंत, दिलीप माळी, जगदीश कालगावकर, संतोष वेल्हाळ, समीर रोहिडा, शांतीलाल कोटेचा, ऋषिकेश कन्स्ट्रक्शनचे इंजि. सुरेश सूर्यवंशी, इंजि. श्रीकांत पाटील, शालिनी हॉटेलचे उदय शेट्टी, बॉम्बे स्टीलचे श्रीरंग चव्हाण, जयभारत क्लॉथ स्टोअर्सचे हिरोशेठ आहुजा, निळकंठ उर्फ नाना टिंगरे, मंगेश कोरे, गुणवंत माळी, सुशिल थोरबोले, सुहास औताडे, अभिजीत देशिंगकर, मारूती गुरव, तानाजी लांडगे, अरिहंत एजन्सीचे प्रकाश लुनिया, शंभोराजे काटकर, रामा माळी, आप्पा पाटील, सुभाष हिंगमिरे, मुख्यमंत्री वैद्याकिय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, तासगांव-कवठेमहांकाळ तालुका वैद्याकिय मदत कक्ष प्रमुख सचिन शेटे, आदींनी श्रीं चे दर्शन घेऊन रथोत्सवात आपला सहभाग दाखवला.
ताई खोबरे..ताई पेढे एकच जल्लोष…
तासगांवच्या या प्रसिध्द रथोत्सवात रथ ओढत असताना प्रसादाची पहिली ओळख दिवाणजी खोबरे..अशी होती. त्यानंतर विश्वस्त स्व. निरंजन पटवर्धन यांचे नावाची ओळख होती. तर रविवारी झालेल्या रथोत्सवात विश्वस्त राजेंद्र पटवर्धन तसेच आदितीताई पटवर्धन थांबून होते. प्रारंभापासून आदितीताई रथोत्सव शांततेत पार पडावा असे आवाहन करून आवश्यक त्या सुचना देत होत्या. हे सर्व असले तरी रथ ओढल्यानंतर गणेशभक्त ताई खोबरे..ताई पेढे..असा एकच जल्लोष करीत होते आणि त्यास दाद देत ताई खोबरे, पेढे प्रसादाची उधळण गणेशभक्तांसाठी करीत होत्या.