मारोळी प्रतिनिधी
धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील महालिंगराया व हुन्नूर बिरोबा या गुरू- शिष्यासह सात देवतांच्या पालख्यांचा भेटीचा सोहळा उत्साहात रंगला. भंडारा, खोबरे व लोकरीची उधळण करत “महालिंगराया बिरोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात लाखो भाविकांच्या साक्षीने अभूतपूर्व सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
महाराष्ट्र , कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखोंच्या संख्येने धनगर बांधव या अनोख्या भेटीसाठी हुलजंती येथे आले होते. या गुरुशिष्यांच्या भेटी दरम्यान हजारो टन भंडारा खारीक खोबरे आणि लोकराची उधळण झाल्याने अवघा परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला होता. बाराव्या शतकापासून चालत आलेली ही परंपरा असून मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान हा अनोख्या भेटीचा सोहळा पार पडला.सालाबादप्रमाणे ही भेट मंगळवारी दुपारी चार वाजता गावाबाहेरील बिरोबा मंदिरा पासून सुरू झाली. भाविक रात्री बिरोबा महालिंगराया यांच्या नात्यातील ओव्या, भजन व किर्तन करून रात्रभर कर्नाटकातून आलेल्या भाविकांचे या कार्यक्रमाने जागरण केले व पहाटे तीन ते पाच महालिंगराया मंदिरावरील मुंडास पाहण्यासाठी महालिंगराया मंदिराजवळ भाविकांची गर्दी झाली होती.
महालिंगराया व बिरोबाच्या जयघोषाने सगळा परिसर दणाणून गेला होता.गुरु शिष्य असणारे नाते बिरोबाची पालखी महालिंगराया पालखीला भेट देते. प्रत्येक भेटीवेळी भाविक मोठ्या प्रमाणात भंडारा, खोबरे मेंढ्यांची लोकर या पालख्या वर मुक्तपणे उधळत असतात. त्यामुळे येथील पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी आलेले प्रत्येक भाविक भंडाऱ्यामध्ये नाहून निघाला होता. भेट नंतर आलेला भाविक वर्षभरासाठी देवावर व पुजाऱ्यावर विश्वास ठेवून वर्षभराची भाकणूक ऐकून परत जातो. यावेळी विविध राजकीय पक्षाचे नेते व अधिकारी, आजी – माजी सरपंच व हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लाखोंच्या संख्येने धनगर समाज वर्षभर वाट पाहत असतो . आजच्या सोहळ्यात कपाळाला भंडारा आणि डोक्यावर कांबळ ओढलेल्या अनेक पुजाऱ्यांच्या भाकणुकीने भक्तीमय वातावरणात भेटीचा नयनरम्य सोहळा पडला.
भाकणूक
हुलजंतीच्या यात्रेत गुरु शिष्याच्या भेटीचा सोहळ्या बरोबरच भाकणूकीला प्रचंड महत्व आहे भाकणुकीमध्ये एकमेकांचे फेटे फेकून दिल्यामुळे राजकारणामध्ये बदल होण्याची शक्यता असून रोगराई वाढेल परंतु त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल तसेच खरीप कमी तर रब्बी पिक जास्त, पाऊस काळ जास्त असेल असे भाकणूक वर्तवण्यात आले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








