शर्यतीत जिंकणाऱ्याला मिळते मोठे बक्षीस
पत्नीला उचलून घेत पळण्याची जागतिक स्पर्धा 31 वर्षांपासून आयोजित होत आली आहे. फिनलंडच्या यूकोनकांटो येथील सोनकाजर्वीमध्ये 1992 मध्ये हा प्रकार खेळाच्या स्वरुपात सुरू करण्यात आला होता. ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली हे स्पष्ट नाही, परंतु प्रत्येक जण यासंबंधी वेगवेगवळे किस्से सांगत असतो. आज जगभरात पतीकडून पत्नीला खांद्यांवर उचलून घेण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. अनेक देशाचे लोक या खेळात सामील होत असतात.

स्पर्धकांना स्वत:च्या पत्नींना अनेक प्रकारे उचलून नेण्याची अनुमती आहे. पत्नी स्वत:च्या पतीच्या खांद्याभोवती स्वत:च्या पायांचा विळखा घालून उलटी लटकू शकते. पती स्वत:च्या पत्नीला खांद्यांवर लटकवून धावत असतो. या स्पर्धेत विजयी होणाऱ्याला मोठे बक्षीस मिळत असते.
या स्पर्धेत विजयी होणाऱ्याला त्याच्या पत्नीच्या वजनाइतकी बियर बक्षीसादाखल दिली जाते. जगभरात हा खेळ अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, हाँगकाँग आणि जर्मनीतही हा खेळप्रकार लोकप्रिय ठरला आहे. वाईफ कॅरीइंग चॅम्पियनशिपला जगातील 7 सर्वात अजब ‘शक्तीच्या कारनाम्यां’पैकी एक मानले जाते. स्पर्धेत भाग घेणाऱ्या पत्नीचे वय कमीतकमी 17 वर्षे असणे आवश्यक आहे तसेच तिचे वजन किमान 49 किलोग्रॅम असणे गरजेचे आहे. पत्नीचे वजन कमी असल्यास पतीला आयोजकांकडून देण्यात आलेली एक वजनदार रुकसॅक सोबत न्यावी लागते.









