वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विपरित परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य भारतात आहे. भारत अमर असून त्याचा कधीही अंत होणार नाही. भारताचे स्वऊप अमर बीजाप्रमाणे आहे. ते कधीकधी संकटकाळी दबले जाते. पण नंतर तितक्याच जोमाने वर उगवून येते. भारत हा मानवी संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. ते विश्वविख्यात योगी अरविंद यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फफ्सिंगच्या माध्यमातून भाषण करीत होते. हा कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. त्याचे आयोजन पुदुच्चेरीच्या कंबन कलाई संगम येथे ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या अभियानाअंतर्गत करण्यात आले होते, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
योगी अरविंदांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी एका नाण्याचे आणि एका पोस्ट तिकिटाचेही प्रकाशन केले. या प्रसंगी त्यांनी अरविंदांच्या कार्याची आणि योगदानची प्रशंसा केली. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होण्याच्या काळातच अरविंद यांची दीडशेवी जयंती होत आहे, हा योगायोग महत्वाचा आहे.









