सातत्याने सूचना करूनही मनपाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बेळगाव : शहर स्मार्ट बनविण्यासाठी कोट्यावधी निधी खर्ची घालण्यात आला आहे. मात्र शहरांतर्गत रस्त्यांची डागडुजी करण्याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे. न्यू गुड्शेडरोड येथील खड्डे वाहनधारकांना धोकादायक बनला होता. सातत्याने सूचना करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने शास्त्रीनगर परिसरातील कार्यकर्त्यांनी श्रमदानाने सदर खड्डे बुजविले. शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोठे ख•s निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी ड्रेनेज वाहिन्या व जलवाहिन्या घालण्यासाठी चरी खोदण्यात आल्या आहेत. पण या चरी व्यवस्थित बुजविण्यात आल्या नाहीत. रस्ता खोदाई करण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी घेताना नागरिकांकडून रोड कटिंग चार्जिस आकारले जातात. पण महापालिकेकडून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हजार कोटीचा निधी खर्ची घालण्यात आला पण शहरांतर्गत असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी महापालिकेकडे निधी नाही का, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना रस्ते धोकादायक बनले आहेत. न्यू गुड्शेडरोड परिसरातील रस्त्यावर निर्माण झालेला खड्डे वाहनधारकांना त्रासदायक ठरत असल्याने येथील कार्यकर्ते विशाल देशपांडे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सदर खड्डे काँक्रीट घालून बुजविला. ठिकठिकाणी असलेल्या ख•dयांमध्ये स्व-खर्चाने काँक्रीट घातले. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









