शहरातील खराब रस्त्यांचा नेत्रदिप सरनोबत यांना दणका बसला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून शहर अभियंता पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी शहरातील रस्त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यांनी याबाबत राज्याच्या प्रधान सचिवाकडे तक्रारही केली होती. त्यानंतर आज त्यांच्याकडून पदभार काढून घेतल्याची बातमी समोर आली आहे. नेत्रदिप सरनोबत यांच्याकडील शहर अभियंता पदाचा कार्यभार हर्षजीत घाटगे यांच्याकडे सोपवला गेला आहे.
Previous Articleसज्जाकोटीवरून पडलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृत्यू
Next Article चार इलेक्ट्रिक वाहने आणणार मर्सिडिज बेंझ








