प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका सभागृहात चालणाऱया कामकाजाची नेंद ठेवण्याची जबाबदारी कौन्सिल सेक्रेटरी आणि साहाय्यक कौन्सिल सेपेटरी यांच्यावर आहे. मात्र यापैकी साहाय्यक कौन्सिल सेपेटरीपद शासनाने रद्द केले आहे. पण कायमस्वरुपी कौन्सिल सेक्रेटरी नसल्याने प्रभारी अधिकाऱयांद्वारे कामकाज सुरू आहे. त्यामुळे महसूल अधिकारी म्हणून काम पाहणाऱया अधिकाऱयांकडेच कौन्सिल विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
लोकनियुक्त सभागृहात विविध विषयांवर चर्चा केली जाते. तसेच विविध ठराव मंजूर केले जातात. सभागृहात चालणाऱया कामकाजाची नोंद ठेवण्यासह बैठकीचे नियोजन करणे, विषयपत्रिका तयार करणे, इतिवृत्त तयार करणे अशा विविध कामांची जबाबदारी कौन्सिल सेपेटरी आणि साहाय्यक कौन्सिल सेपेटरी यांच्यावर आहे. महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आले नाही. मात्र प्रशासकीय राजवट सुरू असून या कालावधीत होणाऱया घडामोडींची आणि ठरावांची माहिती कौन्सिल विभागाला ठेवावी लागते. लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपल्यानंतर कौन्सिल विभागावरील ताण वाढला आहे. तर महापालिकेत कायमस्वरुपी कौन्सिल सेपेटरी नसल्याने प्रभारी अधिकाऱयांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.
मध्यंतरी महापालिकेत कायमस्वरुपी कौन्सिल सेपेटरीपदी नियुक्ती करण्यात आली. तरीदेखील कामकाजाचा ताण साहाय्यक कौन्सिल सेपेटरीवर होता. मात्र नगरविकास खात्याने साहाय्यक कौन्सिल सेपेटरीपद रद्द केले असून आता सर्व जबाबदारी कौन्सिल सेपेटरीवर सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या कौन्सिल सेपेटरीपदी नियुक्त करण्यात आलेले महादेव बनसे हे सेवानिवृत्त झाले. पण त्यांच्या पदी नवीन अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली नाही. कौन्सिल सेपेटरी पदाचा कार्यभार सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पण दोन्ही पदांची जबाबदारी असल्याने कौन्सिल विभागाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी यापूर्वीचे साहाय्यक कौन्सिल सेपेटरी एफ. बी. पिरजादे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पण साहाय्यक कौन्सिलपद रद्द झाल्याने महसूल अधिकारीपदी पिरजादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कामकाज कौन्सिल विभागाचे करावे लागत आहे.
महसूल अधिकारी म्हणून
आर. एस. चव्हाण यांची नियुक्ती महापालिका महसूल विभागात तीन महसूल अधिकाऱयांची पदे आहेत. यापैकी एका पदावर संतोष अनिशेट्टर व दुसऱया पदावर एफ. पी. पिरजादे यांची नियुक्त करण्यात आली आहे. तसेच रिक्तपदावर आर. एस. चक्हाण यांची महसूल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.









