Crime- बातमीतील त्या खुनाचं रहस्य उलगडण्यास कोल्हापूर पोलिसांना 24 तासांमध्ये यश प्राप्त झाला आहे. व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळूनच बापाने मुलाला डोक्यात लोखंडी पाईप घालून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीचे वडील दत्ताजीराव सर्जेराव थोरात (वय 57) भाऊ अभिजीत दत्तात्रेय थोरात (वय 26 दोघे रा. गोटखिंडी ता. वाळवा जि. सांगली) या दोघांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेली आहे.
गुरुवारी बाचणी ते निढोरी मार्गावर एका इसमाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तपासांती हा मृतदेह अमरसिंह दत्ताजीराव थोरात याचा असल्याचे स्पष्ट झाले होते. अज्ञातांनी वार करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा मृतदेह कागल ते मुरगुड जाणाऱ्या रस्त्यालगत टाकून दिला होता. त्याबाबत तपास करत असता कोल्हापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अमरसिंह थोरात हा कोल्हापुरातील एका महाविद्यालयात लॉचे शिक्षण घेत होता. तो दारूच्या आहारी गेला होता. चैनीसाठी तो घरातील लोकांना त्रास देत होता. 30 मे रोजी तो आपल्या सांगली जिल्ह्यातील गोठखिंडी या गावात गेला होता. त्यावेळी मोबाईल घेण्यास वडिलांच्याकडे अमरसिंह दीड लाख रुपये मागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पैसे दिले नसल्याने वडील आणि त्यांच्यात भांडण झाले होते. पैसे दिले नाहीत तर घरातील लोकांना ठार मारण्याची धमकी अमरसिंह यांनी दिले होते. त्याचा राग आल्यानेच वडिलांनी लोखंडी पाइपने अमरसिंह यांच्या डोक्यात घातली. अमरसिंह जखमी होऊन जमिनीवर पडला. मात्र उपचार न करताच त्याला ठेवल्याने अमरसिंह त्यात मृत्यू झाला. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी होंडा कंपनीच्या अमेझ गाडीतून नेऊन मृतदेहाला घटनास्थळी टाकण्यात आला. अशी कबुली वडिलांनी कोल्हापूर पोलिसांना दिली.