बेळगाव: सीमावासीयांच्या महामेळाव्याच्या धास्तीने पोलीस प्रशासनाने वॅक्सीन डेपोवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. वॅक्सीन डेपोपर्यंत येणाऱ्या सर्व मार्गांवरील रस्त्यावर बॅरिकेट्स घालून अडथळा निर्माण केला जात आहे. मेळाव्याच्या धास्तीने पोलीस प्रशासनाने बॅरिकेट्स घातले असले तरी त्यामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत. शाळेला ये जा करणारी वाहने, वर्दीच्या रिक्षा तसेच कार्यालयात जाणारे कर्मचारी या सर्वांना यामुळे मोठा वळसा घालून पुढे जावे लागत आहे. सर्वत्र पोलीस वाहनांसह तैनात करण्यात आल्यामुळे मेळाव्याबद्दल प्रशासनाने धास्ती घेतली आहे हेच सिद्ध होते.