1.55 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विवेक ओबेरॉयचा व्यवसायिक भागीदार संजय साहा याला पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसापुर्वी आनंदिता एंटरटेनमेंट LLP चे भागीदार भागिदार असलेले संजय साहा, नंदिता साहा, राधिका नंदा यांच्यासह अनेक जणांविरुद्ध विवेक ओबेरॉय याने पोलीसांत तक्रार दाखल केली होती.
अभिनेता विवेक ओबेरॉयने 2017 मध्ये ‘ओबेरॉय ऑरगॅनिक्स’ नावाची मनोरंजन कंपनी सुरू केली होती. पण काही दिवसांनी तिला व्यावसायिक अपयश आल्यामुळे, विवेक ओबेरॉयने प्रथम संजय साहा, नंदिता साहा, राधिका नंदा यांना आपल्या फर्ममध्ये भागीदार म्हणून आणण्याचा निर्णय घेऊन नंतर तो ‘आनंदिता एंटरटेनमेंट’च्या नावाखाली सुरु केला. विवेक ओबेरॉयच्या तक्रारीनंतर, संजय साहा यांच्यासह, त्याची आई नंदिता आणि राधिका यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या वर्षीच्या जुलैमध्ये, विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी यांच्यावतीने त्यांचा कर्मचारी देवेन बाफना यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार साहा कुटुंबियांनी विवेकला एका कार्यक्रमात आणि फिल्म निर्मितीमध्ये पैसे गुंतवण्यास सांगुन आणि नफ्याचे आश्वासन दिले. पण नंतर ते पैसे चुकीच्या कामासाठी वापरले.