कृष्णात चौगले,कोल्हापूर
कोल्हापूर-गगनबावडा-वैभववाडीमार्गे तळ कोकणासह गोवा राज्यास जोडणाऱ्या करूळ घाटातील रस्त्याची केवळ चाळणच नव्हे तर अक्षरश: दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची अनेकदा मलमपट्टी करून देखील ‘मागील बाकी पुढील पानावर’ अशी अवस्था झाली आहे. रस्त्यावर सुमारे दीड ते दोन फुटांचे खड्डे पडल्यामुळे मार्गक्रमण करताना कंटेनरसह अनेक मोठी वाहने रस्त्यातच नादुरुस्त होऊन बंद पडतात. परिणामी अनेकदा घाटातील वाहतूक ठप्प होऊन वाहनधारकांची कुचंबना होत आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांची मालिका कायम असून अनेक वाहनधारकांचा बळी गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील केवळ खड्डे बुजवण्याऐवजी योग्य दर्जाचा रस्ता करावा अशी मागणी होत आहे.
गगनबावडा-तळेरे रस्ता ‘राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी’ या राष्ट्रीय महामार्गाची गगनबावडा-वैभववाडी ते करुळ घाट ही लांबी ‘राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी’ विभागाच्या कार्यक्षेत्रात येते. सदर लांबीमध्ये सन 2022-23 च्या पावसाळ्यात अतिवृष्टी व मालवाहतूकीच्या जड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर ख•s पडले आहेत. हे खड्डे भरुन महामार्ग सुस्थितीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष घाट रस्त्याची अवस्था दयनिय आहे. भरलेले खड्डे अवघ्या आठ ते दहा दिवसांत पुन्हा पुर्ववत होत असल्यामुळे त्यासाठी खर्च केलेला निधी देखील खड्यात जात आहे.
उत्तम प्रतीचा नवीन रस्ता करा
या रस्त्यांवरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरु असते. तळ कोकणासह गोव्याशी जोडणारा हा सोयीस्कर घाट असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु असते. त्यामुळे या रस्त्यावर मोठा ताण येतो. तळ कोकणातील जिल्हे हे कोल्हापूरतील बाजारपेठेशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होते. त्यामुळे घाटातील सुमारे 12 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी उत्तम प्रतीचा नवीन रस्ता करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन
गेल्या दोन वर्षांपासून करूळ घाट रस्त्याची दुरावस्था झाली असताना देखील रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून त्याच्यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. वेळोवेळी ख•s मुजवण्याच्या पलिकडे काहीच केलेले नाही. रस्त्याच्या दुरुस्तीनंतर तो किती दिवस टिकला, त्यावर किती डांबर पडले, आणि कोणी किती डल्ला मारला हा विषय संशोधनाचा आहे. या अंतर्गत घडामोडींकडे लक्ष घालण्यापूर्वी तत्काळ नवीन घाट रस्ता करण्याची मागणी कोल्हापूरसह तळकोकणातील अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांतून होत आहे.
घाट रस्ता काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर – कार्यकारी अभियंता
दरवर्षी अतिवृष्टीमध्ये गगनबावडा ते वैभववाडीला जोडणारा घाट रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब होतो. ही बाब रस्ते परिवहन मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानुसार सन 2022-23 च्या वार्षिक आराखड्यामध्ये या घाट लांबीमध्ये काँक्रिट रस्त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास मंजूरी प्राप्त झालेली असून या कामाची निविदा काढण्यात आली असल्याचे रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे म्हणणे आहे. कॉक्रिट रस्ता झाल्यानंतर सदर घाट लांबीमधील प्रतिवर्षी ख•s पडल्यामुळे वाहतूकीस होणारा त्रास दूर होणार आहे. तसेच अपघात होऊ नयेत यासाठी रस्ता सुरक्षेची कामेही त्यामध्ये अंतर्भूत असल्याने जड वाहतूक, पर्यटक यांनाही त्याचा फायदा होणार आहे. घाट रस्त्यामधील ख•s भरून रस्ता देखभाल दुरुस्तीचे काम अविरत सुरु ठेवण्यात येणार असून लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संदीप यादव यांना पत्राद्वारे कळविले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









