खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल, बससेवा ठप्प होण्याची भीती
वार्ताहर /जांबोटी
बैलूर-तोराळी-गोल्याळी संपर्क रस्त्याची पार दुर्दशा झाली असून या रस्त्याच्या दुऊस्तीकडे शासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे खराब रस्त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तरी या रस्त्याची त्वरित दुऊस्ती करावी, अशी मागणी बैलूर परिसरातील नागरिकांमधून होत आहे बैलूर-तोराळी-गोल्याळी या रस्त्याचे अंतर साधारण दहा किलोमीटर आहे. सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी नाबार्ड योजनेअंतर्गत या रस्त्याची दुऊस्ती करण्यात आली होती. मात्र तेंव्हापासून या रस्त्याच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यापैकी हब्बनहट्टी-बैलूर क्रॉस ते देवाचीहट्टीपर्यंतच्या दोन किलोमीटर रस्त्याचे दोन वर्षापूर्वी तसेच वर्षभरापूर्वी बैलूर गावापासून दीड कि. मी. रस्त्याचे माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नातून दुऊस्ती करण्यात आल्यामुळे सदर रस्ता सुस्थितीमध्ये असला तरी उर्वरित रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
या रस्त्यावर नावालाच डांबर शिल्लक आहे. तसेच रस्त्यावरील संपूर्ण खडी उखडून गेली असून रस्त्यावर अनेक ठिकाणी गटारीसदृष्य चरी पडल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अयोग्य बनल्याने या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक कोलमडली आहे. नागरिकांना दुचाकी चालविणे देखील दुरापास्त बनले आहे. तसेच या रस्त्याअंतर्गत येणाऱ्या तोराळी ते गोल्याळी गावापर्यंतच्या 5 किलोमीटर रस्त्याची देखील दुर्दशा झाली आहे. सुमारे 15 वर्षांपूर्वी नाबार्ड योजनेतून या रस्त्याची निर्मिती करण्यात आल्यामुळे गोल्याळी, तळावडे, बेटगिरी या दुर्गम भागातील नागरिकांना रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली होती. तसेच या रस्त्यावरून दिवसातून दोनवेळा खानापूर, गोल्याळी, तळावडे तसेच बेळगाव-बैलूर-तोराली अशी बससेवा सुरू करण्यात आल्यामुळे या भागातील जनतेला खानापूरच्या तालुक्मयाच्या ठिकाणी तसेच बेळगाव आदी ठिकाणी संपर्क करणे सोयीस्कर झाले होते. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून या रस्त्याच्या दुऊस्तीकडे देखील संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याची अवस्था देखील दयनीय झाली असून रस्त्यावर पडलेल्या ख•dयांमुळे गोल्याळी व तळावडे गावची बससेवा ठप्प होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
त्वरित दुरुस्तीची मागणी
सध्या या भागात ऊस तोडणीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बैलूर व जांबोटी भागातील ऊस पुरवठा म्हाळुंगे येथील नलवडे शुगर्स कारखान्याला करण्यात येत असल्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रकचालकांना खराब रस्त्यामुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावऊन ऊस वाहतूक कशी करावी, असा प्रश्न शेतकरी वर्गाना भेडसावीत आहे. तरी आमदार विठ्ठल हलगेकर व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष घालून बैलूर- तोराळी- गोल्याळी रस्त्याच्या दुऊस्तीसाठी निधी मंजूर करावा व त्वरित रस्त्याच्या दुऊस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी बैलूर, जांबोटी, गोल्याळी भागातील नागरिकांमधून होत आहे.









