सावंतवाडी –
येथील अमर जवान क्रिएशन प्रस्तुत दोन अंकी विनोदी मालवणी कोर्टात खेचीन हे नाटक मसुरे येथे संपन्न झाले . १९७१ च्या भारत – पाक युद्धाचा विजयी दिन आणि श्री स्वामी मंडळ महाराज पुण्यतिथी यांचे औचित्य साधून दि १६ डिसेंबर रोजी या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते . श्री गंगाराम गव्हाणकर यांच्या लेखणीतून साकार झालेले आणि प्रा . शेखर गवस यांच्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनातून रंगमंचावर नाटक संपन्न झाले .अमर हुतात्मा जवान वीरपुम लाडू विठू गवस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जगदिश गवस यांनी अमर जवान क्रिएशनची निर्मिती केली आहे . या नाटकास श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला .
या नाटकाचे नेपथ्य बाबा सुतार, राजेश फोंडेकर, प्रमोद तांबे, दत्ताराम कुळये, तुषार सावंत यांनी केले होते. मनाला भिडणारे पार्श्वसंगीत शेखर गवस, दयानंद कसालकर यांनी केले. तर पहाटेची सूर्यकिरण पडावीत एवढी सहज प्रकाशयोजना करणारे ऋषिकेश (दादा) कोरडे यांनी केले. वाखाणण्याजोगी , वेशभूषा रंगभूषा श्रद्धा परब, प्रमोद तांबे यांनी केली. अशा या दोन अंकी धमाल विनोदी नाटक “कोर्टात खेचिन”… पाहिल्यानंतर आलेल्या मुंबईकराला मुंबईला जाणे नक्कीच कठीण होईल तर मुंबईकराला गावची ओढ लागल्याशिवाय राहणार नाही.









