अन्यथा स्टेडियम उभारण्यास विरोध, स्थानिक युवकांचा इशारा
प्रतिनिधी /पेडणे
सुकेकुळण परिसरात आयुष इस्पितळ शेजारी धारगळ येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य द्यावे तसेच प्रकल्प बांधकाचा शुभारंभ करण्याअगोदर 50 टक्के नोकऱया स्थानिक तसेच पेडणेतील बेकार युवकाना देण्याचे लेखी आश्वासन सरकारने आणि जिसीऐने न दिल्यास तसेच स्थानिकाना विश्वासात न घेतल्यास स्टेडियम उभारण्यास कडाडून विरोध करुन आंदोलन करण्याचा इशारा धारगळ येथील तसेच पेडणे मतदारसंघातील युवकांनी पञकार परिषदेत दिला.
धारगळ पंचायत क्षेत्रातील युवकांनी तसेच पेडणे मतदारसंघातील युवकांनी सुकेकुळण धारगळ येथे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणाऱया नियोजित प्रकल्पाच्या जागेत दिला. यावेळी प्रशांत हरमलकर , रितेश कांदोळकर, श्यामसुंदर कानोळकर , प्रताप कानोळकर , झिलू नारोजी, राजू सावंत , शुभम गडेकर, राजदिप गरड आदी युवक मोठय़ा संख्येने युवक उपस्थित होते.
50ज्ञ् नोकऱया स्थानिकांना द्याः प्रशांत हरमलकर
यावेळी बोलताना प्रशांत हरमलकर म्हणाले क्रिकेट स्पेटेडियम उभारण्यासाठी लाखो चौरस मीटर जागा शेतकऱयांची कवडीमोल किंमतीत घेतली.माञ त्या जागेत आयुष्य इस्पितळ प्रकल्प उभारण्यात आला.आणि राहिलेल्या जागेत आता क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार. माञ या प्रकल्पावर धारगळ येथे ज्याच्या जमिनी गेल्या तसेच जे मतदारासंघातील बेकार युवक आहेत त्यांना त्याठिकाणी 50 टक्के नोकऱया द्यावेत. सरकारने आणि संबाधीत यंञणेने तसेच पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी केली.
स्थानिकांनी जमिन पिडिताना नोकऱया न दिल्यास विरोध करणार : श्यामसुंदर कानुळकर
यावेळी श्यामसुंदर कानुळकर म्हणाले प्रकल्प सुरी होण्याअगोदर लिखित नोकऱया देण्याचे आश्वासन द्या नपेक्षा प्रकल्पासाठी कडाडून विरोध करणार आहोत प्रकल्प बांधकाम हाती घेण्याअगोदर स्थानिक पंचायत तसेच आमदार त्यांना सांगून आम्हाला 50 ज्ञ् स्थानिकांना या नोकरीत प्राधान्य द्यावे अशी मागणी या केली.
यावेळी बोलताना रितेश कानुळकर म्हणाले , सरकार गरीब शेतकऱयांच्या जमिनी ह्या कवडीमोल किमतीने विविध प्रकल्पासाठी घेत आहे .आमच्या जमिनी मोठय़ा प्रमाणात या प्रकल्पासाठी सरकारने घेतलेले आहे. मात्र गेली अनेक वर्ष आमची लागवड तसेच काजू बागायती शेती या प्रकल्पासाठी गेली तसेच मोपा विमानतळ लिंग रस्ता त्यासाठीही अनेकांच्या जमिनी गेल्या , मात्र त्यांना योग्य तो मोबदला दिला गेला नाही . सरकार या कवडीमोल किमतीत जमिनी घेऊन त्या बिल्डर लॉबीच्या घशात घालत आहे .आणि खाजगी कंपनीला देण्याचा घाट सरकारने घातलेल्या असून याप्रकरणी ही आम्ही संबंधित आमदार तसेच सरकारला विचारू इच्छितो की येणाऱया क्रिकेट स्टेडियमवर आम्हाला स्थानिकांना किती नोकऱया देणार.बेकार युवक मोठय़ा संख्येने आसून आमची बेरोजगारी हटवा अशी मागणी यावेळी केली. स्थानिकांना विश्वासात न घेता हे प्रकल्प राबवले जात असून आयुष्य इस्पितळे हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे मात्र अजून पर्यंत स्थानिक पंचायत तसेच या भागाचे आमदार यांना याबाबत कुठलीच कल्पना किंवा माहिती उपलब्ध नसते स्थानिक पंचायतीला आणि ग्रामस्था?ना डावलून हे प्रकल्प या ठिकाणी होत आहेत .भविष्यात असे प्रकार आम्ही खपून घेणार नाही. वेळप्रसंगी आम्ही या प्रकल्पाविरोधात आंदोलन उभारणार तसेच रस्त्यावर येणार असे या इशारा या स्थानिक युवकांनी दिला.
आमदार प्रवीण आर्लेकर यांना सह्याचे निवेदन
तद्न?तर पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी त्यांच्या धारगळ येथील निवासस्थानी जाऊन यांना साह्यांचे निवेदन देऊन त्यानी क्रिकेट स्टेडियम वर नोकरी देण्याची मागणी केली. सरकारने आम्हाला लिखित स्वरुप आश्वासन क्रिकेट स्टेडियम पायाभरणी कार्यक्रम अगोदर द्यावे अशी मागणी केली.
पेडणेतील युवकांना व स्थानिकांना डावलल्यास आपण युवकासोबत आंदोलनात रस्त्यावर उतणारः आमदार प्रवीण आर्लेकर
यावेळी बोलताना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले कि पेडणेकरांची समस्या ही माझी समस्या आहे. जर धारगळ तसेच पेडणे परिसरातील युवकांना क्रिकेट स्टेडियमवर तसेच आयुष्य इस्पितळ प्रकल्पावर नोकऱया न दिल्यास आपण त्यांच्या सोबत आंदोलनात रस्त्यावर उतरणार असे आश्वासन निवेदन घेतल्यावर युवकांना दिले.









