एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान हैदराबादहून थायलंडला जातानाची घटना
वृत्तसंस्था/ हैदराबाद
एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शनिवारी टेकऑफ केल्यानंतर फक्त 16 मिनिटांनी हैदराबादला परतले. बोईंग 737 मॅक्स 8 आयएक्स110 हे विमान हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 6:40 वाजता निघाले. विमान सकाळी 11:45 वाजता थायलंडमधील फुकेत येथे उतरणार होते. तथापि, उ•ाणानंतर काही वेळातच वैमानिकाने विमान हैदराबादला परत आणले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली. मात्र, बिघाडाबाबतची नेमकी स्थिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. परत येण्यापूर्वी उ•ाण फक्त 16 मिनिटे हवेत राहिले.
हैदराबादमधील या घटनेपूर्वी बुधवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे लखनौहून दुबईला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आले होते. लखनौहून सकाळी 8:45 वाजता उ•ाण करणारे आणि दुबईला 11:35 वाजता पोहोचणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान बोर्डिंगपूर्वीच थांबवावे लागले होते. या विमानातून 160 जण प्रवास करणार होते.









