दुसऱ्या रेल्वेगेटवरील प्रकार : फाटक उघड-बंद करण्यात अडथळा
बेळगाव : अज्ञात वाहनाने मंगळवारी मध्यरात्री धडक दिल्याने टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेटचे फाटक मोडले. त्यामुळे बुधवारी सकाळी दुसरे फाटक बसवावे लागले. परंतु, ते फाटक वर-खाली होत नसल्याने गेटमनला बरीच मेहनत करावी लागली. यामुळे फाटक उघडण्यास व बंद करण्यास वेळ लागत होता. टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेटचे हेरवाडकर स्कूलच्या बाजूच्या फाटकाला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की फाटकाचा लोखंडी खांब तुटला. याची माहिती गेटमनला मिळताच त्याने तात्पुरत्या स्वरुपात जुने रेल्वेगेट बंद-चालू करण्यास सुरुवात केली. यापूर्वीही वाहनांनी धडक दिल्याने रेल्वेफाटकाचे नुकसान झाले होते. नैर्त्रुत्य रेल्वेने नवीन तंत्रज्ञानाचे फाटक काही महिन्यांपूर्वीच बसविले होते. रेल्वेफाटक बंद व चालू करणे सुलभ असल्याने सर्वच रेल्वेगेटवर अशी नवीन फाटक बसविण्यात येत आहेत. परंतु, रात्रीच्यावेळी वाहनांमुळे रेल्वेगेटचे नुकसान होत आहे.









