वार्ताहर /कडोली
कडोली येथे गुढीपाडव्यासह श्री बसवाण्णा देवालयाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला नवीन वर्षाचा शुभारंभ होतो. या पार्श्वभूमीवर येथील संबंध शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात जावून पूजा अर्चा करून नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि शेती व्यवसायात भरभराट होवो, अशी प्रार्थना केली. तसेच सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी श्री बसवाण्णा देवालयाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी गावातील शेतकऱ्यांनी बैलजोडींची मिरवणूक काढून मंदिराला प्रदक्षिणा घातली. यावेळी देवस्थान पंचकमिटी आणि हक्कदारांच्या वतीने गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर आंबील तिर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.









