कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
उच्च शिक्षणातील बहुविध शाखांमध्ये शिक्षण घेत करिअर करणाऱ्या महिलांचे प – माण गेल्या पाच दशकांच्या तुलनेत वाढले आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवसाय अथवा इतर शाखांमध्ये महिला पुरूषांच्या बरोबरीने असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनातही ‘ती’चा टक्का वाढला आहे. घर संसार आणि इतर जबाबदाऱ्यां सांभाळत पुरुषांच्या बरोबरीने महिला संशोधनात आघाडीवर आहेत. स्टार्टअपमधून स्वतंत्र व्यवसाय करून त्या तो यशस्वीपणे सांभाळत असल्याचे चित्र आहे.
दहावी, बारावी ते पदव्युत्तर शिक्षणात महिला अव्वल आहेत. शिवाजी विद्यापीठात महिला संशोधकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जागतिक संशोधन आणि क्रमवारीत ‘टॉप टू पर्सेंटेज’मध्ये विद्यापीठातील पुरूषांच्या बरोबरीने महिला संशोधकांनी सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले आहे. विद्यापीठातील 39 अधिविभागांतील प्राध्यापकांपासून ते अधिविभागप्रमुख, अधिष्ठाता पदावर महिला आहेत. विद्यापीठातील वित्त आणि लेखाधिकारी सुध्दा महिलाच आहे. अलीकडे विज्ञानात पीएच.डी. करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. पुढे जाऊन संशोधनातही अनेक महिलांनी आपले स्थान भक्कम केले आहे. या संशोधनाचे रूपांतर स्टार्टअपमध्ये करून अनेकींनी आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्याची उदाहरणे आहेत. लग्नानंतर संसार आणि करिअरची जबाबदारी एकाचवेळी सांभाळत तारेवरची करसरत करत, संशोधन करावे लागते. तरीही अनेक महिला देश–विदेशात जाऊन समाजोपयोगी संशोधन करत आहेत. यावऊनच महिलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब होते.
विद्यापीठातील गेल्या पाच दशकांतील आकडेवारी पाहता शिक्षण घेणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. ती दरवर्षी वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रपती सुवर्णपदक, कुलपती सुवर्णपदकाचा बहुमानही महिलाच मिळवत आहेत. उच्च शिक्षणानंतर अध्यापन, उद्योग, व्यवसाय, डॉक्टर, अभियांत्रिकी, संगणक प्रोग्रामिंग–डिझायनिंग, बँकिंग, राजकारण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आदी क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला कार्यरत आहेत. शिक्षणातील विविध आव्हाने सक्षपणे पेलत पीएच.डी., संशोधनप्रकल्पही स्वतंत्रपणे करण्यात महिला अव्वल आहेत. त्यानंतरच्या फेलोशिपसाठी त्या पात्र होत फेलोशिप घेऊन परदेशात जाऊन संशोधनही करत आहेत. त्यामुळेच विद्यापीठच नव्हे तर भारतासह जगभरात महिला संशोधकांचा टक्का वाढत असल्याचे दिसत आहे.
- पालकांच्या सपोर्टमुळे महिला उच्च शिक्षणासह नोकरी करता आहेत
महिलांमध्ये सृजनक्षमता, चिकाटी असल्याने घर–संसार सांभाळत त्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. पालकांची मानसिकता बदलल्याने मुलींना शिक्षण, संशोधन आणि नोकरीसाठी घरातून चांगला सपोर्ट मिळतो. त्यामुळे उच्च शिक्षणासह नोकरी करून स्वत:च्या पायावर उभे राहणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे येथून पुढची पिढी उच्च शिक्षणात अव्वल राहील, याची खात्री आहे.
डॉ. आसावरी जाधव, अधिविभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र, शिवाजी विद्यापीठ
- दोन वर्षातील उत्तीर्ण महिलांची संख्या
वर्ग 2024 2025
बारावी 50,512 51,823
दहावी 50,510 60,000
पदवी व पदव्युत्तर 36,000 380,00
संशोधन 150 200
स्टार्टअप 2 10








