मालवण : प्रतिनिधी
जिल्ह्यात आज शून्य सावली दिवसाचा अनुभव जिल्हाविसीयांनी घेतला. शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सूर्य माथ्यावर असताना सूर्याला पावसाळी ढगांच्या रंगासारखे गोल रिंगण पहावयास मिळाले. मोठ्या कुतुहलाने लोक इमारतींमधून बाहेर पडत मोबाईलमध्ये हा क्षण टिपत होते. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अंश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. मालवणवासीयांनी शुक्रवारी हा शून्य सावली विशेष खगोलीय दिवस अनुभवला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









