पाटगांव प्रतिनिधी
मधाचे गांव पाटगांव हा ब्रॅन्ड तयार करून देश पातळीवर बाजार पेठ मिळवून देणार असून मध उत्पादक पाच गावांना प्रत्येकी दहा लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात असल्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.ते पाटगांव (ता.भुदरगड)येथील लोकार्पण सोहळा व मधपाळ मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. खासदार संजय मंडलिक, राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ सभापती रविद्र साठे,जिल्हा अधिकारी राहूल रेखावार प्रमुख उपस्थित होते.
मध उत्पादकांनी शुध्द नैसर्गिक मध उपलब्ध करून मधाचे दर्जेदार उत्पादन करावे. यामुळे परिसरातील तरुणांना रोजगारांची संधी मिळणार आहे. मध व्यवसायांकांना शासनामार्फत योग्य सहकार्य केले जाईल. पाटगांव परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत निधी देऊ.असं यावेळी मुश्रीफ म्हणाले आहेत.
खासदार संजय मंडलिक केंद्रीय पर्यटमंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत दुर्गम भागातील मधाचे गाव‘पाटगाव’ हे कांस्य पदक विजेते गाव ठरले आहे. ही बाब कौतुकास्पद आहे सेंद्रीय मधला बाजारात चांगला भाव मिळणार आहे असे सांगितलेप्रस्ताविकात जिल्हा आधिकारी राहूल रेखावार यांनी मधाचे गांव पाटगांव साठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत दोन कोटी सत्ताविस लाख रुपयांचा निधी दिला. इंडो काऊट कंपनीने मध उत्पादकाना बाराशे मधपेट्या दिल्या.या भागातील महिलांना देखील रोजगार मिळणार आहे लवकरच पाटगांव हे मधाचे गाव म्हणून देश पातळीवर येणार असल्याचे सांगितले.
मुश्रीफ यांच्या हस्ते मध संकलन माहिती केद्राचे, हनी पार्क सेल्फी पाईंट यांचे उद्घाटन झाले.यावेळी खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, नाबार्ड उपव्यवस्थापक अनिलकुमार रावत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रातांधिकारी वसुंधरा बारवे, तहसिलदार अश्विनी आडसुळ ‘ प्रकल्प समन्वयक संदेश जोशी ‘माजी सभापती धनाजीराव देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार , यशवंत नांदेकर विजय बलुगडे ‘सरपंच विलास देसाई, रामदास देसाई प्रणाली तवटे, बाजीराव कांबळे ग्रामसेवक आर एम पाटील, के एस चव्हाण मंडळ अधिकारी राजेश तोळे,रत्नाकर देसाई आदी उपस्थित होते .जिल्हा ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी श्रीकांत जौजांळ यांनी आभार मांनले.









