एका चित्रपटासाठी आले एकत्र
प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशी आणि साहिल खान लवकरच पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसून येणार आहेत. त्यांच्या या नव्या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु दोन्ही अभिनेते सुमारे 20 वर्षांनी एका चित्रपटात दिसून येतील. शर्मन आणि साहिलने यापूर्वी 2001 मध्ये प्रदर्शित ‘स्टाइल’ या चित्रपटात काम केले होते. तर 2003 साली ‘एक्सक्यूज मी’ या चित्रपटातूनही त्यांची जोडी झळकली होती. शर्मन आणि साहिलच्या नव्या चित्रपटाचे लवकरच चित्रिकरण सुरू होणार आहे. या चित्रपटातून एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याचे चित्रिकरण प्रामुख्याने अबुधाबीत पार पडणार आहे. या चित्रपटाची कथा अन् संवाद मिलाप झवेरी याचे असणार आहेत. हा एक अत्यंत मनोरंजक चित्रपट असेल असे झवेरी यांनी म्हटले आहे. तर शर्मन जोशी आणि साहिल खान या दोघांनीही चित्रिकरणासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.









