आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर यांची औरवाडच्या सभेत विरोधकांना चपराक
कोल्हापूर :
मुस्लिम समाजाने माझे संबंध इतके जवळचे आहेत की विरोधकांनी कितीही वार केले तरी आमच्या संबंधांमध्ये तुसूभरही अंतर पडणार नाही, याची खात्री मला आहे. ज्या-ज्या वेळेला माझ्यावर संकटे आली तेव्हा मुस्लिम समाज माझ्या पाठीशी उभा होता. आणि मुस्लिम समाजावर ज्या-ज्या वेळी संकटे आली त्या-त्या वेळी राजेंद्र पाटील यड्रावकर हा छातीचा कोट करून पुढे राहिला आणि यापुढे राहणार आहे. मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंत कार्यरत राहिलो आहे, यापुढेही कार्यरत राहीन. आपल्यात जो जीवाभावाच्या पलीकडचा जिव्हाळा आहे, तो कायम ठेवूया. अशी अपेक्षा राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली. औरवाड येथे झालेल्या सभेत आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. प्रारंभी स्वागत मुस्ताक पटेल यांनी केले.
यावेळी दादेपाशा पटेल, रशिद पटेल, लतिफ पटेल, राजू रावण, आनंदा पाटील यांनी आपल्या मनोगतातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर कार्याचा आढावा घेतला.
यावेळी इम्तियाज पटेल, साहेबपाशा पटेल, कादर पटेल, आप्पासाहेब म्हैशाळे, सरपंच शफी पटेल, उपसरपंच अफसर पटेल, सईद पटेल गुरुजी, लतीफ पटेल, राजू रावण, बाशु मुल्ला, राजू गावडे, नारायण गावडे, आनंदा पाटील, विजय दुग्गे, यासीन बहादूर, रवी माने, अण्णाप्पा कांबळे, अकलाख पटेल, तनवीर बहादूर, रामा रावण, दीपक रावण, रशिद पटेल, सत्तार पटेल, सुधाकर एरंडवले, जमीर पटेल, पोपट गावडे, विशाल दुग्गे, लक्ष्मण जगताप, संजय कांबळे, बाबासो मुल्ला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौरवाड येथे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी गावातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर कवठेगुलंद येथे झालेल्या सभेत माजी सभापती मल्लाप्पा चौगुले यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय निश्चित असल्याचे सभेत सांगितले. त्यानंतर संवाद यात्रा शेडशाळ येथे पोहोचल्यानंतर भाजपचे नेते संजयदादा पाटील यांनी आपल्या भाषणातून आमदार यड्रावकर यांचे कौतुक करून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. गणेशवाडी मध्ये सदाशिव आंबी यांनी आमदार यड्रावकर यांना मत म्हणजे विकासाला मत असे मत व्यक्त करून यड्रावकर यांच्या विजयाचा निर्धार केला. दुपारच्या सत्रात आलास येथे सय्यद सादात दर्ग्याला आमदार व मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांनी गलेफ अर्पण करून विजयाचा निर्धार केला. बुबनाळ येथे झालेल्या सभेत ज्येष्ठ नेते जगन्नाथ जाधव यांनी आमदार यड्रावकर यांच्या विजयाची सभा बुबनाळमध्येच घेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.








